पिस्तुल बाळगणार्‍या तरूणाला अटक   

दोन पिस्तुलांसह मोटार जप्त

कवठे येमाई, (वार्ताहर) : सणसवाडी ता. शिरुर येथे कारमधून दोन गावठी पिस्तुल घेऊन फिरणार्‍या युवकाला दोन गावठी पिस्तुल, आठ जिवंत काडतुसे, चार मेगझिन व मोटारीसह शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने अठक केली. संकेत पांडुरंग तांबिले असे पआरोपीचे नाव आहे.सणसवाडी येथील सराटे वस्ती येथे एक युवक एका मोटारीमध्ये दोन गावठी पिस्तुल ठेवून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली. 
 
त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, विकास पाटील, रोहिदास पारखे, जयराज देवकर, अमोल नलगे, पोलीस शिपाई प्रतिक जगताप, नारायण वाळके यांनी सणसवाडी येथील सराटे वस्ती जात पाहणी केली असता त्यांना एक मोटार दिसून आल्यान चालक तरूणाला अडवून झडती घेतली दोन गावठी पिस्तुल सह आठ जिवंत काडतुसे, चार मेगझिन मिळून आल्या. 

Related Articles